तुमच्या आधार कार्डवर मिळणार ५० हजार रुपयांचं बिनव्याजी कर्ज, पीएम स्वनिधी योजना !

सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत असतात. त्यापैकी एक योजना म्हणजे “पंतप्रधान स्वानिधी योजना”.केंद्र सरकार या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचं काम सुरू करण्यासाठी आणि काम वाढवण्यासाठी १०-५० हजारांचं विनातारण कर्ज देत आहे.

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार गरजू लोकांना ५० हजार रुपयांचे कर्ज विना व्याज देत असते. या कर्जाची रक्कम मुदतीत म्हणजेच एका वर्षात जर परत केली, तर कर्जदाराला पुढील कर्जात दुप्पट रक्कम कर्ज म्हणून दिली जाते. तसेच पंतप्रधान स्वानिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गॅरंटरची गरज लागत नाही.

pm svanidhi yojana

पीएम स्वनिधी योजना

देशातील अल्पभूधारकांना केंद्र सरकार कर्ज देण्याची सुविधा पंतप्रधान स्वानिधी योजनेद्वारे उपलब्ध करून देत आहे. या योजनेचा लाभ कोणताही लहान आणि मध्यम उद्योगपती घेऊ शकतो. ५० हजार रुपयांपर्यंत या योजनेद्वारे तुम्हाला कर्ज मिळू शकते. केंद्र सरकार ५० हजार रुपयांपर्यंत स्वानिधी योजनेंतर्गत कर्ज देते.

तुम्हाला तुमची विश्वासार्हता निर्माण करावी लागेल तेंव्हा तुम्ही ५० हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी पात्र ठराल. १०,००० रुपयांचे पहिले कर्ज या योजनेंतर्गत कोणालाही मिळेल. एकदा पहिल्या कर्जाची परतफेड दिलीय मुदतीत केल्यानंतर दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज म्हणून घेता येते.

‘लाडका भाऊ योजने’साठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

योजनेची मुख्य उद्दिष्टं

या योजनेंतर्गत फेरीवाल्यांना विनातारण 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज घेता येईल. या योजनेचा लहान व्यापारी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना मदत करणं हा आहे. घेतलेलं कर्ज हप्त्यांमध्ये1 वर्षाच्या आत फेडता येतं. डिजिटल पेमेंटवर 1,200 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक कर्जदारांना दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदार करत असलेल्या कामाची माहिती
  • पॅन कार्ड
  • बँकेत बचत खाते असणे गरजेचे आहे
  • उत्पन्नाचा स्रोत
  • कर्ज हमी आवश्यक नाही

पीएम स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा कराल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी केंद्राची अधिकृत वेबसाइट भेट द्या.

होमपेजवर जा आणि तेथे “Apply Loan 10k/Apply Loan 20k/Apply Loan 50k” वर क्लिक करा.

या ठिकाणी तुमचा मोबाइल नंबर नोंदवा, तुमच्या मोबाइलवर SMS च्या माध्यमातून एक OTP येईल.

OTP पडताळणी झाल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म समोर येईल. त्या फॉर्मची प्रिंट आउट काढून घ्या.

यानंतर संपूर्ण फॉर्म व्यवस्तीत भरा, सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या स्वनिधी केंद्रांवर फॉर्मसहित सर्व आवश्यक कागदपत्रे जाऊन जमा करा.

स्वनिधी योजनेंतर्ग पडताळणीनंतर कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल.

पीएम स्वनिधी योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा

ऑफलाईन अर्ज कसा कराल

तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल. बँकेतून अर्ज घ्या आणि त्यासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे जोडा.

त्यानंतर संबंधित फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडा. यानंतर, तुमचा फॉर्म आणि तुमच्या कामाची छाननी केली जाईल. सर्व बाबी योग्य आढळल्यास, तुम्हाला कर्जाची रक्कम प्रदान केली जाते. या योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन बँकांद्वारेहि अर्ज करु शकता.

सुरु करा PM जन औषधी केंद्र; सरकार देणार आता 5 लाख रुपयांची मदत, जाणून घ्या कोणती कागदपत्रे आवश्यक !

Leave a Comment