‘लाडका भाऊ योजने’साठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता महाराष्ट्रातील शिंदे सरकारने तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे. याच योजनेला “लाडका भाऊ योजना” असं म्हटलं जात आहे. 12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6 हजार, डिप्लोमा धारकांना 8 आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

या योजनेमध्ये सदर विद्यार्थी ( भाऊ) कंपनीत अप्रेंटीस म्हणून काम करेल आणि त्या भावाला त्या बदल्यात विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच ज्या कंपनीत विद्यार्थी (भाऊ) अप्रेंटीस घेत असेल त्याचे पैसे सरकार भरणार आहे.

योजनेचा फायदा कुणाला मिळणार ?

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना, या योजनेचा फायदा 12 वी उत्तीर्ण झालेल्या तरुणाला, तसेच डिप्लोमा आणि पदवीधर तरुणांना होणार आहे. या तरुणांना अनुक्रमे सहा,आठ आणि दहा हजार रुपये महिन्याला मिळणार आहे.

यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असावे. तसेच अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असले पाहिजे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सुरू; जाणून घ्या कुठे आणि कसा करायचा अर्ज ? Apply Online

योजनेसाठी पात्रता आणि अटी काय ?

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.

उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही किमान 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर इतकी असणे आवश्यक आहे. राज्यातील बेरोजगार तरुणच या योजनेसाठी पात्र असतील. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.

योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये काय ?

राज्यातील बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांच्यासाठी रोजगार तयार केले जाणार. प्रशिक्षणासोबत तरुणांना दरमहा १० हजार रुपयांच्या आर्थिक मदतही दिली जाणार.

प्रशिक्षणादरम्यान, राज्य सरकार 12वी, डिप्लोमा आणि पदवी उत्तीर्ण तरुणांना अनुक्रमे दरमहा 6,000 रुपये, 8,000 रुपये आणि 10,000 रुपये शिकावू भत्ता देणार आहे. या योजनेमुळे राज्यातील तरुणांचे तांत्रिक आणि व्यावहारिक कार्य कौशल्य वाढण्यास मदत होईल.

लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज केल्यास सरकार ६ महिन्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ देणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणकर्त्याला पगाराचा लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 10 लाख तरुणांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे.

राज्यातील जास्तीतजास्त तरुणांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सरकार 6,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळाल्यानंतर युवक कोणताही रोजगार सहज आणि सुलभ पद्धतीने सुरू करू शकेल.

10 वी पाससाठी होमगार्ड जवान पदाच्या 9700 रिक्त जागांसाठी भरती. जाहिरात पहा..!

आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • वय प्रमाणपत्र
  • चालक परवाना
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • बँक खाते
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट फोटो

योजनेसाठी नोंदणी कुठे करायची?

योजनेच्या शासन निर्णयानुसार, सदर योजनेसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करतील.

योजनेचे कामकाज उदा. कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती, विद्यावेतन, उमेदवारांची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इ. बाबी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात येतील.

विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प,शासकीय, निमशासकीय आस्थापना/महामंडळ,उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, सामाजिक संस्था त्यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी नोंदणी संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील.

सदर योजनेचा आता महाराष्ट्र सरकारने जीआर देखील जारी केला आहे. जाणून घ्या त्या जीआर मध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहू…

माझा लाडका भाऊ योजनेचा GR पाहण्यासाठी – येथे क्लिक करा

लाडका भाऊ योजना अधिकृत संकतस्थळ – येथे क्लिक करा

लाडका भाऊ योजना नोंदणी / अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ – येथे क्लिक करा

लाडका भाऊ योजनेसाठी कुठे अर्ज करणार?

  • तरुणांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
  • तरुणांना यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
  • तिथे होम पेज उघडल्यानंतर New User Registration या बटनावर क्लिक करावं लागेल.
  • तिथे क्लिक केल्यानंतर लगेच पुढे अर्ज ओपन होईल.
  • या अर्जात विचारलेली सर्व माहिती तरुणांना अतिशय काळजीपूर्वकपणे भरावी लागेल.
  • यानंतर अर्जात मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमीट बटनवर क्लिक करावं लागेल.
  • अशा माध्यमातून अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.


10 वी पाससाठी भारतीय पोस्ट खात्यात 44,228 जागांसाठी भरती, अर्ज सुरू…!

Leave a Comment