10 वी पाससाठी होमगार्ड जवान पदाच्या 9700 रिक्त जागांसाठी भरती. जाहिरात पहा..!

महाराष्ट्र होमगार्ड मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना एक चांगली संधी चालून आली आहे. अनेक दिवसांपासून वाट पाहत असणाऱ्या संधीच सोन करण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र होमगार्ड संघटनेने होमगार्ड पदांवरील रिक्त जागांसाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. ही संधी खासकरून अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांनी पदानुसार आवश्यक शिक्षण पूर्ण केलेले आहे. महाराष्ट्र होमगार्ड संघटनेमध्ये एकूण 9700 रिक्त जागांसाठी भरती होत आहे.

महाराष्ट्र होमगार्ड संघटनेने मोठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 34 जिल्ह्यातील 9700 होमगार्ड पदे भरली जाणार आहे. यासाठी जाहिरात पत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. 10 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत. महाराष्ट्र राज्यात होमगार्ड पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

10 वी पाससाठी भारतीय पोस्ट खात्यात 44,228 जागांसाठी भरती, अर्ज सुरू…!

भरती संबंधित सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात….

भरतीचा तविस्तर तपशील

पदाचे नाव – होमगार्ड जवान

एकूण रिक्त पदे – होमगार्ड जवाब पदासाठी 9700 जागा रिक्त आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता

वयोमर्यादा – दिनांक 31 जुलै 2024 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 50 वर्ष दरम्यान असावे.

उंची – पुरूषांकरिता 162 सेमी. उंची तर महिलांकरिता 150 सेमी. उंची असणे आवश्यक आहे.

छाती – फक्त पुरुष उमेदवारांकरीता न फुगविता छाती 76 सेमी. असावी आणि कमीत कमी 5 सेमी फुगवणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया

आवेदन शुल्क – होमगार्ड नोंदणी साठी कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जात नाही.

अर्ज प्रक्रिया – उमेदवाराने आपला अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने पाठवायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख – दिनांक 15 जुलै 2024 ही अर्ज सुरू होण्याची तारीख आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – होमगार्ड जवान पदासाठी उमेदवार दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.

सुरु करा PM जन औषधी केंद्र; सरकार देणार आता 5 लाख रुपयांची मदत, जाणून घ्या कोणती कागदपत्रे आवश्यक !

नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सुचना

1) होमगार्ड जवान पदासाठी अर्ज करताना अधिकृत संकेतस्थळावर फक्त इंग्रजी भाषेमधून भरावयाचा आहे. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.

    नोंदणी अर्ज भरण्यासाठी – येथे क्लिक करा

    2) अर्जदार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्याच पोलीस ठाणे अंतर्गत अर्जदाराने अर्ज दाखल करायचा आहे. इतर जिल्हयातील अर्ज बाद करण्यात येतील.

    3) अर्ज “SUBMIT” केल्यावर “Print Registration Form” या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढून घेणे आवश्यक आहे.

    4) छायांकीत प्रत घेतल्यावर त्यावर आपला सध्याचा एक फोटा चिटकवायचा आहे आणि फक्त आपले नाव मराठी भाषेत पेनानी लिहायचे आहे.

    5) सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करण्यात येईल.

    6) कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन येणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात.

    7) दोन फोटो आणि मुळ कागदपतत्रासह उपस्थिती नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक आहे.

    8) उमेदवारांना नोंदणीकरीता स्वः खर्चाने उपस्थित रहावे लागेल, कसल्याही प्रकारचा जाण्यायेण्याच्या किंवा राहण्याचा भत्ता दिला जाणार नाही.

    9) नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास जबाबदारी सुपंर्ण उमेदवाराची राहील.

    10) पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.

    11) दोन उमेदवारांना जर समान गुण मिळाले तर ज्येष्ठ वयानुसार उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल. आणि जर समान वय असेल तर शैक्षणिक अहर्ता व तांत्रिक प्रमाणपत्रांच्या आधारावर निवड निश्चित करण्यात येईल.

    नोट – अर्ज भरणेसंदर्भात काही अडचन असल्यास जिल्हा होमगार्ड कार्यालय सातारा येथे ०२१६२- २२२०८२ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

    अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराने कृपया जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी. जाहिरात ही मराठी भाषेत उपलब्ध आहे.

    ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी – येथे क्लिक करा

    ऑनलाइन अर्ज कसा भरायचा याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती होमगार्ड संघटनेकडून प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. कृपया जाहिरात सविस्तर पहा.

    होमगार्ड जवान भरती जाहिरात पाहण्यासाठी – येथे क्लिक करा.

    महिलांना मिळणार आता 1 ते 2.5 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज; लखपती दिदी योजना !

    Leave a Comment