भारतीय पोस्ट खात्यात 35000 पदांसाठी भरती, पात्रता 10 वी पास; ‘या’ दिवशी सुरु होणार अर्जप्रक्रिया!

दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना भारतीय पोस्ट विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्ट खात्याकडून ‘ग्रामीण डाक सेवक’ पदाच्या एकूण 35000 रिक्त जागेवर जम्बो भरतीची माहिती देण्यात आली आहे.

15 जुलै 2024 रोजी याबाबतची अधिकृत अधिसूचना पोस्ट खात्याकडून जारी करण्यात येणार आहे. परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी असणार आहे. ‘ग्रामीण डाक सेवक’ पदाची पात्रता पूर्ण करणारे उमेदवार 15 जुलैला अधिकृत अधिसूचना जारी झाल्यांनतर तात्काळ अर्ज करू शकणार आहेत.

कोण अर्ज करू शकतो?

भारतीय पोस्ट खात्यातील ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असलेला विद्यार्थी अर्ज करू शकतो. उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण झालेला असावा. तसेच उमेदवाराने दहावी परीक्षेत आपल्या मातृभाषेचा अभ्यास केलेला असावा. तसेच उमेदवाराला संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! CAPF मध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी मोठी भरती सुरु

पोस्ट खात्यातील ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी 18 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळणार आहे.

काय आहे शेवटची मुदत?

‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी भारतीय पोस्ट खात्याकडून अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. अधिकृतरित्या याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. अधिकृतरित्या देण्यात आलेल्या महितीनुसार, अर्ज सुरू होण्याची तारीख 15 जुलै असेल तर अर्ज करण्याची शेवटाची तारीख ऑगस्ट महिन्यापर्यंत असू शकते असे सांगितले जात आहे.

कशी होईल निवड?

गुणवत्तेच्या आधारावर भारतीय पोस्ट खात्याच्या ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. 10वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड होईल. निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.त्यानंतर शेवटचा ‘डीवा राउंड’ पार पडल्यानंतर उमेदवाराची निवड होईल.

महाभरती !! 10 वी पाससाठी भारतीय डाक विभागात होणार तब्बल 40 हजार पदांवर भरती…!

किती पगार मिळेल?

‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांवर एबीपीएम/जीडीएस पोस्टचा पगार दरमहा 12 हजार ते 24 हजार रुपये इतका असेल. तसेच बीपीएम पदांचा पगार 12 हजार ते 29 हजार रुपये प्रति महिना इतका असणार आहे.

किती असेल परीक्षा शुल्क?

‘ग्रामीण डाक सेवक’ पदांसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य वर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित आणि पीएच श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे नाही.

अधिक माहितीसाठी भारतीय पोस्ट खात्याच्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – येथे क्लिक करा

Leave a Comment