माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सुरू; जाणून घ्या कुठे आणि कसा करायचा अर्ज ? Apply Online

Mazi Ladki Bahin Yojana, ही योजना 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित,विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिलांसाठी आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला 1 हजार 500 रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या पात्रतेसाठी सर्व लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपये पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. यासाठी सर्व लाभार्थी महिलांना अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला काढणे आवश्यक असणार आहे.

Mazi Ladki Bahin Yojana

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी 15 जुलै ही अंतिम तारीख असणार आहे. तसेच 16 जुलै रोजी तात्पुरती यादी प्रकाशित केली जाईल. प्रकाशित तात्पुरत्या यादीवर अर्जदार तक्रार, हरकती दाखल करू शकणार आहेत. 1 ऑगस्टला अंतिम यादी प्रकाशित केली जाई आणि 15 ऑगस्ट रोजी योजनेचा 1 हजार 500 रुपयांचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जारी केला जाईल. प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत या योजनेचा लाभ महिलांच्या बैंक खात्यात जमा केला जाईल.

महिलांना उद्योगासाठी 4 टक्के व्याज दराने मिळणार कर्ज; अर्ज केला का?

पात्रता काय ?

माझी बहिण लाडकी योजनेसाठी लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थी महिलेने सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ असलेल्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच लाभार्थी महिलांच्या नवे ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसावे.

कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही ?

कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्तीचे असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच जर कुटुंबातील कोणीही सदस्य आयकरदाता असेल तसेच संयुक्तरीत्या शेतजमीन ही 5 एकर पेक्षा जास्त असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. शासकीय सेवेत रुजू, कंत्राटी कर्मचारी, कायम कर्मचारी, उपक्रम, मंडळ कर्मचारी, केंद्र आणि राज्य सरकारी सेवेतील कार्यरत कर्मचारी तसेच चारचाकी वाहन ( ट्रॅक्टर वगळता) असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

आवश्यक कागदपत्र

  • योजनेचा ऑनलाईन अर्ज.
  • आधार कार्ड.
  • महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र.
  • कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला.
  • बँक खाते, पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • रेशन कार्ड.
  • योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र.

महिलांना सरकारकडून मिळतंय 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; ‘असा’ घ्या लाभ..!

अर्ज कुठे भरू शकता ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी ज्या महिलांना ऑनलाइन अर्ज करता येत नाहीत अशा महिला उमेदवार बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये,अंगणवाडी केंद्रात, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस तसेच सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे येथे अर्ज भरू शकता. अर्ज भरण्याची प्रक्रिया ही विनामूल्य आहे.

ऑनलाइन अर्ज कुठे करायचा ?

तसेच पात्र असलेल्या महिला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. पात्र अर्जदार महिला या योजनेचा अर्ज ऑनलाईन पोर्टल, “नारी शक्ती दुत ॲप” किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करू शकतात.

अर्ज पडताळणी कोण करू शकतो ?

प्राप्त अर्जांची तपासणी तसेच पडताळणी अंगणवाडी सेविका, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षक आणि ग्रामसेवक अर्जांची पडताळणी करू शकतात.

मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी योजनेचा GR पहायेथे क्लिक करा

माझी बहिण लाडकी योजनेचा अर्ज डाउनलोड करायेथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा – अधिकृत संकेस्थळ अद्याप प्रकाशित नाही.

नारीशक्ती दुत ॲप वरून अर्ज करा

नारी शक्ती दूतॲप डाऊनलोड करायेथे क्लिक करा

  • सर्व प्रथम “Narishkati Doot” हे ॲप इंस्टॉल करा.
  • त्यानंतर ॲप ओपन करा आणि आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा, सर्व नियम व अटी स्वीकारा आणि पुढील बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपण प्रविष्ट केलेल्या मोबाईल नंबरवर आपल्याला 4 अंकी OTP प्राप्त होईल, तो 4 अंकी OTP प्रविष्ट करा. त्यानंतर पुढील बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपले नाव,ईमेल आयडी, जिल्हा, तालुका आणि नारीशक्ती प्रकार निवडून आपली प्रोफाइल अपडेट करा.
  • त्यानंतर नारीशक्ती दुत या मुख्यपृ्ठावर या, आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर नवीन पृष्ठ उघडेल, त्यात महिलांनी आपले नाव, पती / वडिलांचे नाव, जन्म तारीख भरा.
  • पुढे अर्जदाराने अर्जदाराचे पत्ता आणि इतर माहिती ( जसे की, जिल्हा, गाव/ शहर, ग्रामपंचायत, पिनकोड, पत्ता, मोबाईल क्रमांक, जात प्रवर्ग आणि आधार क्रमांक भरा.
  • त्यानंतर पुढे शासनाच्या इतर कोणत्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का ? असा प्रश्न विचारला जाईल त्याचे हो/ नाही मध्ये उत्तर द्या.
  • तुम्ही सरकारी आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल तर लाभाची रक्कम नमूद करा.
  • त्यानंतर आपली विवाहिक स्थिती आणि अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील भरा ( जसे की, बँकेचे पूर्ण नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, ई.).
  • त्यानंतर आपल्याला “आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय ?” असा प्रश्न विचारण्यात येईल, होय / नाही मध्ये उत्तर द्या. ( आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्यास, संलग्न करणे आवश्यक आहे.)
  • यापुढे सर्व कागदपत्रे Uplod करा, आधार कार्ड, अधिवास / जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्दराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो.
  • त्यानंतर “Accept हमीपत्र डीसकलमेर ” वर अर्जदाराचे हमीपत्र स्वीकारा. आणि माहिती जतन करा.
  • त्यानंतर पुढील ” भरलेली माहिती कन्फर्म करा” या पेजवर आपल्याला redirects केले जाईल. येथे आपण भरलेली अर्जदाराचा तपशील, अर्जदाराचा पत्ता आणि माहिती, अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील आणि अर्जदाराचे कागदपत्रे तपासून पाहा.
  • त्यानंतर “फॉर्म सबमिट करा” या हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.
  • आपला फॉर्म सबमिट झाल्यावर “Succes has been Verified” असा पॉपअप आल्यावर आपला फॉर्म सबमिट झाला आहे.
  • “यापूर्वी केलेले अर्ज” या पर्यायामध्ये अर्जदार आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकता.

लक्षात असूद्या, ‘नारी शक्ती ॲप’ वर जर काही अर्जदारांचे रजिस्ट्रेशन होत नसेल तर कृपया उद्या प्रयत्न करा.

Leave a Comment