पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजना; दर महिन्याला मिळणार 5550 ते 9250 रुपये व्याज.

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम ही एक पोस्टाद्वारे चालवली जाणार स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम आहे. जी की एक आकर्षक व्याजदरांसह सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. या स्कीम द्वारे आपण नियमित उत्पन्नाचा स्त्रोत तयार करू शकतो. प्रत्येक महिन्याला ज्याला एक ठराविक रक्कम आपले जीवन जगण्यासाठी पाहिजे असेल त्या लोकांसाठी तर ही एक उत्तम योजना आहे.विशेषत: निवृत्तीनंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Post Office Scheme

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम ही एक 100 टक्के सुरक्षित योजना आहे आणि तसेच सरकार द्वारे चालवली जाणारी एक अल्पबचत योजना आहे. या योजनेत निश्चत परतावा मिळतो. आणि तसेच या येजनेत संयुक्त खाते उघडण्याची सुविधा सुद्धा आहे.

ठेव नियम

एकाच खात्याद्वारे जास्तीत जास्त 9 लाख रुपये पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत जमा करता येतात, तर संयुक्त खात्याद्वारे 15 लाख रुपये जास्तीत जास्त ठेवमर्यादा आहे. त्याचबरोबर किमान 1000 रुपयांची गुंतवणूक खाते सुरू करण्यासाठी आवश्यक असते, त्यानंतर ती 1000 रुपयांच्या पटीत जमा करता येते. संयुक्त खात्यात गुंतवणुकीत प्रत्येक धारकाचा समान वाटा असतो.

म्हातारपणासाठी पोस्टाची खास योजना, मासिक उत्पन्न योजना ; दर महिन्याला मिळेल 5500 रुपयांचे निश्चित उत्पन्न

महिलांना उद्योगासाठी 4 टक्के व्याज दराने मिळणार कर्ज; अर्ज केला का?

खाते उघडण्याचे नियम

  • प्रौढ व्यक्ती या योजनेत आपल्या नावाने एकच खाते उघडू शकते, तर 2 किंवा जास्तीत जास्त 3 प्रौढ मिळून संयुक्त खाते उघडू शकतात.
  • संयुक्त खात्यात 15 लाख रुपये जास्तीत जास्त ठेवमर्यादा असेल.
  • पालक अल्पवयीन मुलाच्या नावानेही या योजने अंतर्गत खाते चालू करू शकतात.
  • मुल 10 वर्षांचे अल्पवयीन असेल तर त्याच्या नावावर खाते उघडले जाईल.

ही योजना कशी काम करते?

एप्रिल ते जून 2024 या तीन महिन्यांसाठी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेवर वार्षिक व्याज दर 7.4 टक्के आहे. सदर खात्यात जमा झालेल्या रकमेवर मिळणारे वार्षिक व्याज 12 भागांमध्ये विभागले जाते. मासिक उत्पन्न म्हणून प्रत्येक भाग आपल्यासाठी काम करतो, जो आपण दर महिन्याला काढू शकतो. सदर योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे, परंतु नवीन व्याजदरानुसार 5 वर्षानंतर ती वाढवली जाऊ शकते.

मासिक उत्पन्न गणित Post Office Scheme

जॉईंट खात्यातून जास्तीत जास्त गुंतवणूक : 15 लाख रुपये
व्याजदर : 7.4 टक्के वार्षिक
वार्षिक व्याज : 1,11,000 रुपये
मासिक व्याज : 9250 रुपये

सिंगल खाते असेल तर

सिंगल खात्यात जास्तीत जास्त गुंतवणूक : 9 लाख रुपये
व्याजदर : 7.4 टक्के वार्षिक
वार्षिक व्याज : 66,600 रुपये
मासिक व्याज : 5550 रुपये

मुदतपूर्व योजना बंद करण्याबाबत Post Office Scheme

  1. ठेवीच्या १ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी कोणतीही ठेव काढता येणार नाही.
  2. खाते उघडल्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर आणि तसेच 3 वर्षापूर्वी योजना बंद केली गेली तर मुद्दलातून 2% इतकी रक्कम वजा केली जाते आणि उर्वरित रक्कम दिली जाते.
  3. खाते उघडल्याच्या तारखेपासून 3 वर्षांनंतर आणि 5 वर्षापूर्वी योजना बंद केल्यास मुद्दलातून 1% इतकी वजावट केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल.
  4. पासबुकसह सदर अर्ज सादर करून संबंधित टपाल कार्यालयात खाते मुदतपूर्व बंद करता येते.

Leave a Comment