शेतकऱ्यांसाठी खास..! जमिनींच्या मालकास सातबाऱ्यात कोणत्याही प्रकारचे बदल झाल्यास मोबाईलवर तत्काळ माहित मिळणार; भूमिअभिलेखचे नवं तंत्रज्ञान

E Bhulekh : महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या जमिनीसंदर्भात सातबारा किंवा मिळकत पत्रिकेमध्ये काही बदल होत असल्यास किंवा कोणत्याही स्वरूपाचे बदल होत असल्यास त्याची माहिती लगेच आपल्याला समजण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी अगदी कमी शुल्क आकारून भूमी अभिलेख विभाग आपल्याला ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ ची सुविधा लवकरच उपलब्ध करून देणार आहे.

E Bhulekh

E Bhulekh
E Bhulekh

महत्त्वाचे लेख

भूमी अभिलेख विभागाला जास्तीत जास्त मिळकत ही ऑनलाइन भूमी अभिलेख सातबारा उताऱ्यातील आहे. याशिवाय बदलाची माहिती सुविधा देण्यास सुरुवात केली जात आहे. त्या बदलाचाच एक भाग म्हणून ‘अधिकार अभिलेख’ म्हणजेच सातबारा उतारा अथवा पत्रिकांचे मिळकत डिजिटलायझेशन राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने केले आहे.

याशिवाय फेरफार उताऱ्यावर शंभर टक्के नोंदी या ऑनलाइन घेतल्यावर लगेच समजणार आहे. जमिनीच्या मोजणीची ई- नोटीस ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ई-मोजणी व्हर्जन-दोन हा पर्यायही अर्जदारांना उपलब्ध करून दिला जात आहे.

असे असेल स्वरूप

राज्य शासनाकडून नाममात्र दर निश्चित होणार आहे त्यानंतर प्रतिमिळकत दरवर्षी शासनाकडे तेवढे शुल्क जमा करावे लागणार आहे. त्या मिळकतीवर जेव्हा कधी मोजणी माध्यमातून हद्दीत अथवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कात बदलाबाबत कोणतीही कार्यवाही सुरू असल्यास त्याचा एसएमएस लागलीच ही सुविधा घेणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. जर ई- मेल ची नोंदणी केली असेल तर ई-मेलवरही माहिती मिळणार आहे.

जमिनींच्या मालकास जमीन मोजणीच्या माध्यमातून किंवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कात कोणत्याही प्रकारचे बदल होत असल्यास त्याची माहित तत्काळ मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. साधारणपणे सहा महिन्यांचा कालावधी पोर्टल विकसनासाठी लागणार आहे.

Leave a Comment