सरकारच्या ‘या’ एका योजनेमुळे महिला होताहेत मालामाल, फक्त 2 वर्षात थेट 2.32 लाख रुपये मिळवा..!

Mahila Samman Saving Certificate : आर्थिक दृष्टीने देशातील नागरिक सक्षम व्हावेत यासाठी अनेक योजना सरकारकडून राबवल्या जातात. यातील काही योजना या तरुणांसाठी असतात तर काही योजना या महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असतात. पोस्ट ऑफिस विभागातर्फे सरकारच्या बहुसंख्य योजना या चालवल्या जात असतात. दरम्यान, खास महिलांसाठी पोस्ट ऑफिस विभागातर्फे एक योजना चालवली जाते. गुंतवणूक केल्यास या योजनेत तब्बल 7.5 टक्क्यांनी महिलांना व्याज दिले जाते. विशेष म्हणजे तब्बल 2.32 लाख रुपये फक्त दोन वर्षांत महिलांना मिळू शकतात.

Mahila Samman Saving Certificate

Mahila Samman Saving Certificate
Mahila Samman Saving Certificate

महत्वाचे लेख

दोन लाखापर्यंत रक्कम जमा करता येणार

या योजनेचे नाव “महिला सेव्हिंग सन्मान सर्टिफिकेट योजना” असून ही एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. केंद्र सरकारकडून ही योजना विशेष रुपाने चालू करण्यात आली यामागील कारण म्हणजे फक्त महिलांना आर्थिक सहाय्यता मिळाली पाहिजे. 1 हजार रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत या योजनेत पैसे जमा करता येतात. तुम्ही जमा केलेली रक्कम ही 100 रुपयांच्या पटीत असली पाहिजे. एक व्यक्ती या योजनेच्या माध्यमातून कितीही खाते खोलू शकते परंतु तुम्हाला जास्तीत जास्त या योजनेत 2 लाख रुपयेच जमा करता येतात. तसेच तुम्ही जर दुसरे खाते खोलत असाल तर त्यात तीन महिन्यांचे अंतर असणे गरजेचे आहे.

Mahila Samman Saving Certificate किती व्याज मिळणार ?

या योजनेअंतर्गत वर्षाला 7.5 टक्के व्याज जमा केलेल्या रकमेवर दिलं जातं. हे व्याज तुमच्या खात्यात प्रत्येक तीन महिन्याला जमा केले जाते. या योजनेची मॅच्यूरिटी ही दोन वर्षांची आहे; तरी आपत्कालीन स्थितीत तुम्ही पहिल्या वर्षात जमा केलेल्या रकमेच्या जास्तीतजास्त 40 टक्के रक्कम काढू शकता. आणि फक्त एकदाच ही आपत्कालीन रक्कम काढता येते.

2.32 लाख रुपये मिळणार मॅच्यूरिटीनंतर

समजा 2 लाख रुपये या योजनेअंतर्गत तुम्ही जमा केले तर 7.50 टक्के व्याजदराच्या हिशोबाने तुम्हाला एकूण रक्कम 32044 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला एकूण 2,32044 रुपये दोन वर्षांत मिळतील.

योजनेचे नियम काय आहेत ?

  • या योजनेअंतर्गत अचानक खातेदार महिलेचा मृत्यू झाला तर सदर महिलेच्या कुटुंबीयांना जमा असलेली रक्कम काढता येते.
  • एखाद्या गंभीर आजारावर उपचारासाठीदेखील या योजनेतून रक्कम काढता येते.
  • तुम्ही पैसे काढून घेतल्यानंतर खाते बंद करू शकता.
  • या योजनेअंतर्गत खाते चालू केल्यास 6 महिन्यांनतरच ते बंद करता येते.
  • 6 महिन्यांनतर खाते बंद केल्यास तुम्हाला दोन टक्के कमी व्याजाने रक्कम दिले जाते.

Leave a Comment