Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024 प्रधानमंत्री जन धन योजना 2024

Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024 : लोकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५० कोटींहून अधिक लोकांची जन धन खाती उघडण्यात आली आहेत. सदर योजनेत कोणत्याही वयोगटातील व्यक्ती आपले जनधन खाते उघडू शकतात. या योजनेचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

देशातील सर्व नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत ५ कोटींपेक्षा जास्त लोकांनी आपली जन धन खाती उघडली आहेत. चला, तर आपण या योजनेची सविस्तर माहिती घेऊ या.

Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024

Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024
Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024

संबंधित लेख

पंतप्रधान जन धन खाते कोण उघडू शकते? Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024

भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती पीएम जन धन खाते उघडू शकते, परंतु ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि अद्याप बँकिंग प्रणालीशी जोडलेले नाहीत. तुम्ही हे खाते कोणत्याही प्रकारचा बॅलन्स खात्यात न ठेवता उघडू शकता म्हणजेच खात्यात शून्य रुपये शिल्लक असेल तरी चालेल. तसेच जनधन खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही. हे खाते उघडण्यासाठी वयोमर्यादा नाही.

हे झिरो बॅलन्स खाते आहे. म्हणजेच खाते उघडताना तुम्हाला कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीत. याशिवाय, तुम्हाला त्या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचीही गरज नाही.

सदर जनधन खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याजदराचाही लाभ दिला जातो. याशिवाय खातेधारकाला रुपे डेबिट कार्ड देखील मिळते. त्याच वेळी, खातेदार 10,000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्टसाठी (OD) देखील पात्र आहे.

ओव्हरड्राफ्ट सुविधाही मिळते

या योजनेंतर्गत गरीब वर्गालाही बँकिंग व्यवस्थेत सामील होण्याची संधी मिळाली आहे. सरकार कोणत्याही प्रकारच्या सरकारी योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात DBT द्वारे जमा करते. अशा परिस्थितीत त्यांना या खात्यातून कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येतो. यासोबतच जनधन खात्याच्या मदतीने लाभार्थी विमा योजनेचाही लाभ मिळवू शकतात. जर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल तर तुम्ही खात्यातून ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील घेऊ शकता.

हे खाते तुम्ही कोणत्याही बँकेत उघडू शकता. यासाठी तुम्हाला फक्त मोबाईल नंबर आधार कार्ड आणि पासपोर्ट साइज फोटो लागेल.

कोणत्या योजनेचा लाभ मिळतो?

जन धन खातेधारकांना (PMJDY) सरकारच्या DBT (Direct Benefit Transfer DBT) सुविधेचाही लाभ मिळतो.

प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana PMJJBY)

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana PMSBY)

अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana APY)

मुद्रा योजना Mudra Finance Yojana

तसेच, Micro Units Development & Refinance Agency Bank MUDRAसारख्या अनेक योजनांमध्ये दिलेली रक्कम थेट खात्यात जमा केली जाते.

मला आशा आहे की तुम्हा सर्वांना आमचा हा लेख आवडला असेल. जर तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि लेख वाचल्याबद्दल धन्यवाद.

1 thought on “Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024 प्रधानमंत्री जन धन योजना 2024”

Leave a Comment