Driving Licence Online : घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स आपल्या मोबाईलवर, RTO मध्ये जायची गरज नाही.

Driving Licence Online : भारतात चालक परवाना हा एक खूप महत्त्वाचा दस्तऐवज आहे आणि वाहन चालवण्यासाठी हे दस्तऐवज खूप गरजेचं आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आपल्याला अतिशय मेहनत घ्यावी लागते. कारण त्यासाठीची प्रक्रिया खूप मोठी आणि किचकट असते.

लांबलचक प्रक्रिया आणि ड्रायव्हिंग टेस्ट पास झाल्यानंतरच आपल्याला चालक परवाना मिळतो. आपल्याला भारत देशात ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे असेल तर पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्सपूर्वी लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स बनवावं लागते.

तुम्ही तुमच्या सोयीनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकता. आज आपण घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स कसं बनवायचं, त्यासाठी कसा अर्ज करायचा याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. Driving Licence Online Marathi Information.

लर्निंग लायसन्ससाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच लर्निंग लायसन्ससाठी तुमचं वय १८ वर्ष पूर्ण असने आवश्यक आहे. तसेच तुम्हाला रहदारीच्या नियमांबद्दल माहिती असने आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडे सर्व वैध दस्तऐवज उपलब्ध असले पाहिजेत.

Driving Licence Online
Driving Licence Online

ड्रायव्हिंग परवाना ऑनलाइन उद्देश

देशातील नागरिकांना घरी बसून ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची सुविधा देण्याचा सरकारचा उद्देश आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आजकाल कागदपत्रे बनवणे खूप सोपे झाले आहे.

सध्याच्या काळात तुम्ही ऑनलाईन माध्यमातून आपल्याला आवश्यक कोणतेही सरकारी दस्तऐवज सहज तयार करू शकता.

आधी उमेदवारांना त्यांची अधिकृत कागदपत्रे बनवण्यासाठी सरकारी कार्यालयात जावे लागत असे, त्यात लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे, परंतु आता सध्यस्थितीत ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि सरळ झाली आहे. Driving Licence Online Marathi Information.

यामुळे तुमचा वेळ तर वाचतोच आहे पण पैसा देखील वाचतो आहे.अनेक वेळा उमेदवार आपला वाहन परवाना बनवण्यासाठी एजंटची मदत घेत असतात, परंतु त्यांच्याकडून आपली फसवणूक होण्याची दाट शक्यता असते.

परंतु आता यासाठी तुम्हाला एजंटला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. कारण तुम्ही स्वतः ऑनलाइन आपल्या मोबाईलवरून अर्ज करू शकता आणि तुमचा DL तयार करू शकता.

ऑनलाइन प्रणालीमुळे नागरिकांना एक खास प्रकारची आणि महत्वाची मदत मिळाली आहे. त्यांना आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आरटीओ कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. Driving Licence Online Marathi Information.

ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

● आधार कार्ड
● पत्त्याचा पुरावा
● पत्त्याचा पुरावा (रेशन कार्ड, पॅन कार्ड, वीज बिल)
● जन्मतारीख प्रमाणपत्र (10 वी गुणपत्रिका,जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्र)
● पासपोर्ट आकाराचा फोटो
● स्वाक्षरी
● शिकण्याचा परवाना क्रमांक
● मोबाईल नंबर

Driving License काढण्यासाठी पात्रता काय ?

● उमेदवार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

● अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.

● उमेदवार हा मानसिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे.

● गीअर नसलेल्या ड्रायव्हरसाठी 16 वर्षे वयाचा उमेदवार अर्ज करण्यास पात्र असेल.

● कुटुंबाची संमती असणे आवश्यक आहे. Driving Licence Online Marathi Information.

● अर्जदाराला वाहतूक नियमांची माहिती असावी.

● गियर असलेल्या वाहनासाठी अर्जदाराचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.

ड्रायव्हिंग लायसन्सचे प्रकार कोणते ?

● हलके मोटार वाहन परवाना(Light Motor Vehicle License)

● लर्निंग लायसन्स(Learning License)

● आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स(International Driving License)

● जड मोटार वाहन परवाना(Heavy Motor Vehicle License)

● कायमस्वरूपी परवाना(Permanent License)

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स कसे मिळवायचे ? How to get a Learning Driving License

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यापूर्वी तुमच्याकडे लर्निंग लायसन्स असणे गरजेचे आहे. जर तुम्ही गाडी चालवण्यास इच्छुक असाल आणि तुम्ही इतरत्र गाडीवर फिरण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल. Driving Licence Online Marathi Information.

ऑनलाइन लर्निंग लायसन्ससाठी अर्ज कसा करायचा ?

● सर्वप्रथम सर्व रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. येथे क्लिक करा

● त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक होम पेज उघडेल. या पेजमध्ये तुमचे राज्य निवडा.

● यानंतर तुम्ही नवीन पेजवर पोहोचाल. येथे तुम्हाला ‘Apply for Learner License’ वर क्लिक करा.

● येथे तुम्हाला Aadhaar Authentication पर्याय निवडून आधार नंबर द्या.

● तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी प्राप्त होईल. मोबाईल नंबर व्हेरिफाय करा.

● यानंतर Aadhar eKYC द्वारे तुमची माहिती आपोआप भरली जाईल.

● परवाना तयार करण्यासाठी तुम्हाला काही सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी एक नवीन पेज उघडेल, सुरू ठेवा वर क्लिक करा.

● अर्जाचा फॉर्म तुमच्या स्क्रीनवर दिसेल. अर्जामध्ये प्रविष्ट केलेल्या तुमच्या पसंतीनुसार श्रेणी निवडा.

● फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती प्रविष्ट करा.

● यानंतर सर्व महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करा.

● आता LL Test Slot Online वर क्लिक करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

● यानंतर तुम्हाला तुमची ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल. चाचणी उत्तीर्ण झाल्यास तुम्हाला लर्निंग लायसन्स प्रदान केले जाईल.

● ऑनलाइन टेस्टसाठी लॉग इन डिटेल्स एसएमएसद्वारे रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेंड केल्या जातील.

● लर्नर लायसन्स अप्रूव्ह झाल्यानंतर लायसन्सला Print Learner Licence पर्यायावर जाऊन डाउनलोड करा.

परंतु, Learner Licence काढताना non-Aadhaar eKYC पर्याय जर तुम्ही निवडला तर आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागेल. Driving Licence Online Marathi Information.

येथे तुम्हाला Applicant does not hold Driving/ Learner Licence पर्याय निवडून तुमच्या जवळील आरटीओची निवड करावी लागेल.ऑफलाइन टेस्टसाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागेल.

ड्रायव्हिंग लायसेन्स साठी अर्ज कसा करायचा ? How To Apply for Driving Licence Online

● सर्वात आधी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर भेट द्या. येथे क्लिक करा

● त्यानंतर Online Services मध्ये जा आणि Driving Licence Related Services वर क्लिक करा.

● यानंतर राज्य सिलेक्ट करा

● यानंतर ‘Learner’s Licence Application’ वर क्लिक करा

● त्यानंतर तेथे लिहिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि नंतर तिथे तुमचे वैयक्तिक डिटेल्स भरा

● त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर विचारला जाईल.

● learner’s licence अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरा आणि तिथे मागितलेले दस्तऐवज अपलोड करा.

● त्यानंतर तुमच्या सोयीनुसार ड्रायव्हिंग टेस्टची तारीख निवडा आणि पेमेंट प्रोसेस करा.

ड्रायव्हिंग लायसन्स हरवले तर काय करावे?

● जर ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असेल, तर तुम्ही सर्वप्रथम हरवलेल्या ड्रायव्हिंग लायसन्स साठी पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल करा.

● डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना एफआयआर आवश्यक आहे.

● सर्वप्रथम तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जा.

● तिथे जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्याची तक्रार नोंदवा.

● एफआयआरची प्रत भविष्यात वापरण्यासाठी सुरक्षित ठेवा.

● यानंतर नोटरी ऑफिसमध्ये जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्याचे प्रतिज्ञापत्र तयार करा. हा एक प्रकारचा पुरावा असेल.

● दुसरे ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी, शपथपत्र ड्रायव्हिंग लायसन्स फॉर्मसोबत जोडावे लागेल.

● अशा प्रकारे तुमचे दुसरे ड्रायव्हिंग लायसन्स तयार होईल.

ड्रायव्हिंग लायसन्स अर्जाची स्थिती कशी तपासायची? Driving Licence Application Status

● ड्रायव्हिंग लायसन्स अर्जाची स्थिती तपासण्यासाठी
अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

● राज्याचे नाव निवडा. Driving Licence Online Marathi Information.

● यानंतर, नवीन पेजमध्ये, Application Status च्या पर्यायावर क्लिक करा.

● अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.

● सर्व तपशील भरल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा.

अशा प्रकारे ड्रायव्हिंग लायसन्स अर्जाच्या स्थितीशी संबंधित माहिती दिसेल.

FAQ : ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित काही प्रश्नउत्तरे

प्रश्न : ड्रायव्हिंग लायसन्स का बनवले जातात?

उत्तर : सदर वाहन चालवणारा व्यक्ती वाहन चालविण्यास पात्र आहे, हे दर्शवणयासाठी ड्रायव्हिंग लायसन्स बनवले जाते.

प्रश्न : ऑफलाइन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकतात का?

उत्तर : हो, उमेदवाराला त्याच्या जिल्ह्याच्या RTO कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकतो.

प्रश्न : ड्रायव्हिंग लायसन्स आणि लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

उत्तर : या लेखाद्वारे, तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आणि लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करू शकता, सदर लेखामध्ये अर्ज करण्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे.

प्रश्न : ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पात्रता काय ?

उत्तर : अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. गीअर नसलेल्या वाहनासाठी 16 वर्षे वय आवश्यक आहे.
तसेच अर्जदार किंवा वाहनचालक मानसिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे.

प्रश्न : लर्निंग लायसन्स काढणे आवश्यक आहे का?

उत्तर : हो, सरप्रथम लर्निंग लायसन्स बनवावे लागेल. कारण लर्निंग लायसन्स काढल्यानंतरच तुम्ही DL साठी पात्र आहात.

👉 काय आहे ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ ? या योजनेअंतर्गत आता घराच्या छतावर लागणार सौर ऊर्जा पॅनल…! 👈

Leave a Comment