Pradhan Mantri Suryodaya Yojana : अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यावरून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी एका खास योजनेची घोषणा केली.
या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना वीज बिलात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे (Pradhan Mantri Suryodaya Yojana Marathi Information).
पीएम मोदींनी एक नवीन योजना जाहीर केली आहे, तिचे नाव आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना, यासाठी सरकारचे एक कोटीहून अधिक घरांच्या छतावर सौरऊर्जा बसवण्याचे लक्ष्य आहे.
गरीब आणि मध्यमवर्गीयांकडून विजेवर खर्च होणारा पैसा वाचवणे हा या योजनेचा उद्देश आहे. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटरवर)वर पोस्ट करून या योजनेची माहिती दिलेली आहे.
ट्विटरवर पोस्ट करत पंतप्रधानांनी लिहिले की, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प आहे (Pradhan Mantri Suryodaya Yojana Marathi Information).
आमचे सरकार 1 कोटी घरांवर सोलर बसवण्याचे लक्ष्य घेऊन ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल.
योजनेचे स्वरूप काय ?
केंद्र सरकारने सुरू केलेली रूप-टॉप सोलर योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. या अंतर्गत देशातील विजेच्या वाढत्या किमतींपासून गरीब जनतेला मुक्त करण्यात मदत होणार आहे.
सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून रूप टॉप सोलर म्हणजे सौर यंत्रणा दुर्बल घटकातील कुटुंबांच्या घरांच्या छतावर बसवणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे उद्दिष्ट
● गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल खर्च कमी करणे.
● ऊर्जा क्षेत्रात भारताला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे
● प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा उद्देश सौर ऊर्जा पॅनेलद्वारे वीज उपलब्ध करून देणे आणि अतिरिक्त वीज निर्मितीसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणे हा आहे.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे फायदे काय ?
● योजनेअंतर्गत, छतावरील सौर पॅनेलच्या किमतीच्या 60% अनुदान लाभार्थ्यांना प्रदान केले जाईल.
● लाभार्थींना सौर पॅनेल बसविण्याकरिता व देखभालीसाठी सबसिडी देखील दिली जाईल.
● सौर पॅनेलमधून निर्माण होणारी ऊर्जा घरगुती वापरासाठी वापरली जाऊ शकते.
● सोलर पॅनलमधून निर्माण होणारी अतिरिक्त ऊर्जा वीज वितरण कंपनीला विकली जाऊ शकते.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी पात्रता
● योजनेअंतर्गत, लाभार्थी हा घरगुती ग्राहक असणे आवश्यक आहे.
● लाभार्थीचे निवासस्थान भारतात असावे (Pradhan Mantri Suryodaya Yojana Marathi Information).
● लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करायचा
योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, लाभार्थ्याने त्याच्या स्थानिक वीज वितरण कंपनीशी (डिस्कॉम) संपर्क साधावा. डिस्कॉम अर्ज प्रदान करेल आणि अर्ज प्रक्रियेत मदत करेल.
किंवा
● जर तुम्ही देखील या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्याअंतर्गत तुमच्या घराच्या छतावर रूप टॉप सोलर बसवण्यासाठी इच्छुक असाल तर त्यासाठी नॅशनल पोर्टल फॉर रूफ टॉप सोलरच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. येथे क्लिक करा
● ऑनलाइन नोंदणी करा.
● नोंदणी केल्यानंतर सदर वेबसाईटच्या रूप-टॉप सोलर पर्यायावर क्लिक करा.
● त्यानंतर आवश्यक माहिती भरून लॉगिन करा.
● त्यानंतर नियमावलीनुसार तुम्ही अर्ज करू शकता.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा सर्वाधिक लाभ भारतीय रहिवासी असलेले गरीब आणि मध्यमवर्गीयांना मिळण्याची अपेक्षा आहे (Pradhan Mantri Suryodaya Yojana Marathi Information).
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे निकष
प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही एक महत्वाची योजना आहे जी भारतात सौर ऊर्जेच्या वापराला चालना देण्यासाठी मदत करेल. या योजनेमुळे घरगुती ग्राहकांनाही ऊर्जा खर्च वाचण्यास मदत होणार आहे.
रुफटॉप सोलर कुठे आणि किती बसवणार?
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा करताना पंतप्रधान मोदींनी १ कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्याबाबत बोलले आहे. तथापि, हे प्रथम कोठे स्थापित केले जातील याचा रोडमॅप सरकार लवकरच सादर करू शकते (Pradhan Mantri Suryodaya Yojana Marathi Information).
1 thought on “Pradhan Mantri Suryodaya Yojana : काय आहे ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ ? या योजनेअंतर्गत आता घराच्या छतावर लागणार सौर ऊर्जा पॅनल…!”