PAN Card Download Process: पॅन कार्ड हरवले नो टेन्शन, घरबसल्या काढा आता नवीन पॅन कार्ड, जाणून घ्या सोप्पी प्रोसेस!

PAN Card Download Process : पॅनकार्ड हे सध्याच्या काळात अतिशय महत्वाचे दस्तऐवज आहे. पॅनकार्ड शिवाय बरीचशी महत्त्वाची कामे अडकून पडतात, आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. सरकरी काम, बँकेत, आणि इतर ठिकाणी जसे की बँक खाते उघडण्यापासून तर इतर प्रकारच्या अनेक कामांसाठी पॅनकार्ड गरजेचे आहे.

आणि जर आपल्याला काही महत्वाचे काम करायचे आहे आणि हे दस्तऐवज जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आपल्याला मनस्तापही होतो की आपल्याकडे पॅन कार्ड नाही.

तसेच जर तुम्ही पॅन कार्ड काढले होते पण आता ते चोरीला गेले आहे किंवा गहाळ झाले आहे तर आता काळजी करायची गरज नाही. कारण आज आपण पॅन कार्ड काढण्याचा एक सोप्पा उपाय पाहणार आहोत.जेणेकरून तुम्ही तुमचे पॅन कार्ड अगदी सोप्या पद्धतीने मिळवू शकता.

तुम्हाला जर पॅन कार्ड हवे आहे तर तुम्ही हे अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करून मिळवू शकता, परंतु त्यासाठी तुमच्याकडून काही शुल्क आकारला जाणार आहे. तो शुल्क जास्त नाही फक्त 110 रुपये इतका अर्ज फी म्हणून भरावा लागणार आहे जर तुम्ही भारतीय नागरिक असाल तर.

अशातच, जर तुम्ही परदेशी नागरिक आहात आणि तुम्हाला पॅन कार्ड काढायचे आहे. तर तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी 864 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच याव्यतिरिक्त जीएसटी चार्ज स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहेत.

तसेच, ऑनलाइन पॅन कार्ड काढण्यासाठी आपण जे पेमेंट करणार आहोत तेही अगदी सोयीस्करपणे ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. आपण हे ऑनलाइन पेमेंट नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या मदतीने सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने करू शकणार आहोत.

PAN Card Download Process
PAN Card Download Process

घरबसल्या पॅनकार्डसाठी असा करा ऑनलाइन अर्ज

● ऑनलाइन पॅन कार्ड कडण्यसाठी Apply करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला Protean च्या अधिकृत संकतस्थळावर भेट द्यावी लागेल. येथे क्लिक करा.

● त्यानंतर चार नवीन पॉपअप ओपन होतील त्यावर तुम्हाला continue करत क्लिक करायचे आहे.

● चौथ्या पॉपअप वर तुम्हाला ‘Continue to watch video ‘ आणि ‘Continue ‘ हे दोन पर्याय दिसतील.

● जर तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही पहिल्या पर्यायावर क्लिक करू शकता. यामध्ये पॅन कार्ड विषयी अधिक माहिती पुरवली गेली आहे.

● किंवा तुम्ही ‘continue’ या पर्यायावर क्लिक करून पुढे जाऊ शकता.

● पुढे गेल्यावर तुमच्या मोबाईल वर एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला पिवळ्या पट्टीत ‘Quik Links’ म्हणून एक बार दिसेल.

● त्याच बारच्या उजव्या बाजूला तीन रेषा असलेला मेनू बर दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.

● त्यानंतर ‘ online pan service’ पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.

● आता तुम्हाला ‘Apply for online pan’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

● त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, ऑनलाइन पॅन आपलिकेशन पेज वर तुम्हाला आता Applicants type मध्ये ‘ New Pan – Indian Citizen form 49A’ हा पर्याय निवडायचा आहे.

● जर तुम्ही परदेशी असाल तर ‘New pan – Foreign citizen’ खालील पर्याय निवडा.

● त्यानंतर ‘Category’ सिलेक्ट करा. त्यापुढे ‘Applicant Information’ मध्ये सर्व माहिती भरा.

● सर्वात शेवटी ‘Captcha code’ भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

● आता तुम्ही अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रांची गरज भासणार आहे.

● त्यानंतर नवीन पेजवर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

● संपूर्ण आवश्यक अपलोड केल्यानंतर, तुम्हाला सर्व प्रमाणित दस्तऐवज Protean ला पाठवावे लागणार आहेत.

● जर आवश्याक कागदपत्रे बरोबर असतील आणि ती कागदपत्रे verify झाली तर तुमचे पॅन कार्ड बनवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

● सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड 10 दिवसांत तुमच्या घरच्या पत्त्यावर पाठवले जाईल.

एकंदरीत, अशा पद्धतीने तुम्ही आपले हरवलेलं किंवा चोरीला गेलेले पॅन कार्ड पुन्हा नव्याने घरी बसल्या आणि तेही आपल्या मोबाइल फोन वर इंटरनेटचा वापर करून अगदी पाच मिनटात काढू शकता.

जेणेकरून तुम्हाला या पॅन कार्डचा भविष्यात फायदा होणार आहे. आणि ऐन कामाच्या वेळी तुम्हाला कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

तसेच वरील दिलेल्या ऑनलाइन पद्धतीने, अल्पसा शुल्क भरून तुम्ही अगदी काही मिनटात पॅन कार्ड काध्याची प्रोसेस पूर्ण करू शकता.तसेच तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची किंवा भेट देण्याची गरज भासणार नाही. तुम्ही अगदी घरी बसून पाच मिनटात पॅन कार्ड मिळवू शकता.

FAQ : पॅन कार्ड विषयी आपल्याला नेहमी सुचणार प्रश्न

प्रश्न : पॅन कार्ड म्हणजे काय? (What is Pan Card in Marathi?)

उत्तर: पॅन कार्ड म्हणजे ‘कायम खाते क्रमांक’ (Permanent Account Number ) हा एक प्रकारचा भारतातील सर्व करदात्यांना नियुक्त केलेला ओळख क्रमांक आहे. ही एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे ज्यात एखाद्या व्यक्ती / कंपनी संबंधित सर्व माहिती नोंदविलेली असते.

प्रश्न : पॅनची आवश्यकता का आहे? (Why Pan Card is Necessary?)

उत्तर : पॅन हा एक ओळख क्रमांक आहे जो की ओळखपत्र, पत्ता, कर भरण्यासाठी आवश्यक दस्तावेज, व्यवसायाची नोंदणी, आर्थिक व्यवहार, बँक खाती उघडण्यासाठी आवश्यक आहे.

प्रश्न : पॅन कार्ड कोणासाठी आवश्यक आहे (Who need PAN card? )

उत्तर : पॅन कार्ड व्यक्ती, कंपन्या, फॉरेनर्स, सोसायटी, ट्रस्ट,
फर्म आणि पार्टनरशिप साठी आवश्यक आहे.

प्रश्न : पॅन कार्ड किती दिवसात मिळते ? How many days to get pan card?

उत्तर: पॅन कार्डची प्रोसेस पूर्ण झाल्यावर पॅन कार्ड तुमच्या घरी किमान 10 दिवसाच्या आत पोस्टाद्वारे येते.

👉 RBI ने TATA PAY ला दिली मंजुरी, Google Pay, Phone Pe ला देणार टक्कर..! 👈

2 thoughts on “PAN Card Download Process: पॅन कार्ड हरवले नो टेन्शन, घरबसल्या काढा आता नवीन पॅन कार्ड, जाणून घ्या सोप्पी प्रोसेस!”

  1. Excellent blog here Also your website loads up very fast What web host are you using Can I get your affiliate link to your host I wish my web site loaded up as quickly as yours lol

    Reply

Leave a Comment