E Marksheet Online Download : 10 वी आणि 12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक हरवलेय, आता ऑनलाइन डाऊनलोड करा आपल्या मोबाईलवर, एकदम सोप्पी प्रोसेस, वाचा सविस्तर…!

E Marksheet Online Download : आजच्या धावत्या युगात सर्वच व्यवहार ऑनलाइन झालेले आहेत. त्यामुळे आपण डिजिटली अपडेट असणे आणि तसेच आवश्यक डिजिटल माहिती आपल्याजवळ असणे गरजेचे झाले आहे. आता आपल्याला उपयोगी पडणारे शैक्षणिक कागदपत्रे किंवा सरकारी दाखले एकंदरीत सर्वच कागदपत्रे ऑनलाईन झालेले आहेत.

आणि ही सर्व अतिमहत्वाची कागदपत्रे वेळोेवेळी आपल्याला उपयोगात येत असतात.परंतु या अतिमहत्वाच्या कागदपत्रांपैकी काही कागदपत्रे आपल्याजवळ नसतील तर आपली धावपळ होते.

याच महत्वाच्या कागदपत्रांपैकी आपले किंवा आपल्या मुलांचे १० वी आणि १२ वीचे गुणपत्रकही अतिमहत्वाचे आहे.

एकंदरीत, इयत्ता १० वी व १२ वीचा निकाल आपल्याला खूप महत्त्वाचा असतो. १० वी आणि १२ वीची परीक्षा दिल्यानंतर आपला निकाल कसा असेल ? आपल्याला किती मार्क पडतील ? आपण पास तर होणार ना ? निकालाविषयी अशे अनेक वेगवेगळे प्रश्न मनात असताना एक उत्सुकताही असते.

परंतु जर आपले हेच १० वी किंवा १२ वीचे मार्कशिट जर आपल्याकडून हरवले, फाटले, भिजले,खराब झाले किंवा उंदरांनी कुरतडले तर आपल्याला किती मानसिक त्रास होत असतो.

अशा काही घटना घडल्यास आपल्या मनात वेगवेगळे प्रश्न सतावत असतात. परंतु आता काळजी करायची गरज नाही आता आपल्याला आपले १० वी आणि १२ वीचे E-Marksheet ऑनलाइन डाऊनलोड करता येणार आहे.

आता आपल्याला गाव, शहर, जिल्हा, राज्य वा देश कोणत्याही ठिकाणी आता आपल्याला आपली इयत्ता १० वी व १२ वीचे emarksheet गुणपत्रक व प्रमाणपत्र ऑनलाइन डाऊनलोड करता येणार आहे.

आपल्याला इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीचा निकाल हा प्रत्यक्षात पाहता येतो. तोच निकाल आता E-Portal द्वारे आपल्याला ऑनलाइन पाहता येणार आहे.

E-marksheet बद्दल माहिती

● आपले इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीचे गुणपत्रक प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाने ऑनलाइन उपलब्ध करून दिलेले आहेत.

● आपल्याला घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने E-marksheet मोबाईलवर डाऊनलोड करता येणार आहे.

● विविध कार्यालयात तसेच खाजगी जीवनात याचा फायदा आपल्याला होणार आहे.

● आपले गुणपत्रक व प्रमाणपत्र आता आपण मोबाईल वरून अधिकृत करू शकतो.

● तसेच आपण digilocker मध्ये डाउनलोड केलेले गुणपत्रक व प्रमाणपत्र सेव्ह करू शकतो.

● गुणपत्रक आणि प्रमाणपत्र याबरोबरच आपले आधार, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन आणि इतर आवश्यक कागदपत्रेही आपण डीजीटल लॉकरद्वारे सेव्ह करू शकतो.

● बरोबर असल्याची खात्री करूनच गुणपत्रक व प्रमाणपत्र डाऊनलोड करावे.

● जर आपल्याकडून डाऊनलोड झालेल्या प्रमाणपत्रावर किंवा गुणपत्रकावर चुकीची माहिती असेल तर आपल्या संबंधित विभागीय बोर्डला कळवावे.

● चुकीचे छापील पत्र गुणपत्रक किंवा प्रमाणपत्रक आढळून आल्यास आपल्या बोर्डातून ते दुरुस्त करून घ्यावे.

● महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांनी इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी चे गुणपत्रिक आणि प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध केलेले आहेत.

● सदर उपलब्ध केलेल्या E-Portal वर वर्ष 1990 पासून आता पर्यंतचा सर्व गुणपत्रक डाटा या पोर्टलवर उपलब्ध आहे.

● शासकीय तसेच खाजगी कार्यालयामध्ये हे प्रमाणपत्र व गुणपत्रक वैध असणार आहेत.

● ही सर्व कागदपत्रे E-Portal असल्यामुळे आपल्याला वेळोवेळी पाहता येणार आहेत.

१० वी आणि १२ वीचे गुणपत्रक व प्रमाणपत्रक ऑनलाइन डाऊनलोड कसे करायचे ?

● सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. येथे क्लिक करा

● त्यानंतर, ‘Create New Account ‘ या पर्यायावर क्लिक करा.

● पुढे लॉगिन तयार करा, लॉगिन मध्ये संपूर्ण आवश्यक माहिती भरा आणि स्वतःचा नवीन लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करा.

● त्यानंतर तयार केलेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड व्यवस्थित एका कागदावर लिहून ठेवा.

● सर्व आवश्यक माहिती भरल्यावर आपले प्रथम रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले असेल.

● त्यानंतर समोरील पेजवर इयत्ता ‘Verify SSC 10Mark OR Verify HSC’ या पर्यायावर क्लिक करून लॉगिन करा.

● आपण लॉगिन झाल्यावर इयत्ता १० वी इयत्ता आणि १२ वी चे वर्ष परीक्षेचे सत्र, परीक्षेचा बैठक क्रमांक, परीक्षेमध्ये एकूण मिळालेले मार्कस् या सर्व गोष्टी सबमिट करा आणि व्हेरिफिकेशन करा.

(Select Exam Year, Select Exam Session, Enter Exam Seat Number, Enter Total Obtained Mark For Hardcopy Marks, Enter Verification)

● त्यानंतर download Marksheet हा पर्याय दिसेल,खालील बाजूस आपली मार्कशीट दिसेल, आपली मार्कशीट डाउनलोड करा.

● डाउनलोड केलेल्या मार्कशीट मध्ये आपले नाव, आपले परीक्षेचे वर्ष, विषय, एकूण मिळालेले मार्क तसेच विषयानुसार मार्क आणि आपली टक्केवारी सर्व व्यवस्थित तपासून घ्या.

● जर आपण डाऊनलोड केलेल्या मार्कशीट मध्ये काही चुकीची माहिती असेल तर आपल्या विभागीय बोर्ड कार्यालयामध्ये संपर्क करा.

(चुकीची मार्कशीट किंवा गुणपत्रक डाऊनलोड होत असेल किंवा झाली असेल विभागीय बोर्ड कार्यालयाशी संपर्क साधून दुरुस्त करून घ्यावी)

● विभागीय बोर्ड कार्यालयाशी संपर्क साधून आपण जर दुरुस्ती केलेली असेल तर पुन्हा एकदा आपले गुणपत्रक डाऊनलोड करून तपासून घ्या.

● यानंतर दिलेल्या PDF मधील संपूर्ण माहिती व्यवस्थित पहा आणि आपल्या मार्कशीट वर ‘Signature Vaild’ करुन घ्या.

● ‘Singature vaild’ करते वेळी दिलेल्या सूचनांचे व्यवस्थित पालन करा.

एकंदरीत, आपण डाऊनलोड केलेले गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक बरोबर आहे याची खात्री करुन घ्यावी तसेच आपले विषयाचे गुण, टक्केवारी, आणि एकूण गुण पूर्णपणे खात्री करून घ्यावी.

तसेच डाऊनलोड झालेले गुणपत्रक किंवा प्रमाणपत्रक हे बोर्डाद्वारे असल्याची खात्री करून घ्यावी.

सदर डाऊनलोड केलेले कागदपत्रक हे महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळद्वारे वैध असणार आहेत.

👉 जन्म दाखल्यात मुलांची नावे कशी समाविष्ट करायची? तसेच चुकलेलं नाव कसं दुरुस्त करायचं 👈

3 thoughts on “E Marksheet Online Download : 10 वी आणि 12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक हरवलेय, आता ऑनलाइन डाऊनलोड करा आपल्या मोबाईलवर, एकदम सोप्पी प्रोसेस, वाचा सविस्तर…!”

  1. I loved you even more than you’ll say here. The picture is nice and your writing is stylish, but you read it quickly. I think you should give it another chance soon. I’ll likely do that again and again if you keep this walk safe.

    Reply

Leave a Comment