आधार कार्ड अपडेट करायची संपूर्ण प्रोसेस… जाणून घ्या एका क्लिकवर….!

Adhar Card Update : आजच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. सरकारच्या नवनवीन योजना, बँक योजना अशा अनेक वेगवेगळ्या सुविधांपासून ते सिम कार्ड खरेदी आणि इत्यादी पर्यंत सर्वत्र आधार कार्डची गरज आहे. आधार कार्ड हे आपल्या जीवनातील एक अति महत्वाचा दस्तऐवज आहे.

त्यामुळे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे की आपले आधार कार्ड अपडेट कधी केलेले आहे ? किंवा आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करण्याची आवश्यकता आहे का?

Adhar Card Update

Adhar Card Update

आधार कार्ड दर 10 वर्षांनी अपडेट करावा लागते,अस आपण अनेकदा ऐकलं असेल,परंतु यात किती तथ्य आहे? तसेच आधार अपडेट बाबतचे नियम काय सांगतात? चला सविस्तर माहिती जाणून घेऊया…

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने लोकांना आपापले आधार कार्ड अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषत: ज्या लोकांनी 10 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे परंतु अद्याप आधार अपडेट नाही अशा लोकांना आधार अपडेट करण्यास सांगितले गेले आहे.

संबंधित लेख

आधार कार्ड अपडेट कसे करायचे?

  • सर्व प्रथम अधिकृत संकेतस्थळावर जा. येथे क्लिक करा
  • नवीन पेज उघडेल आता, लॉगिन करा. लॉगिन केल्यावर नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग अपडेट यासारखे तुमचे तपशील सत्यापित करा.
  • यानंतर ‘अपडेट आधार ऑनलाइन’ या बटनावर क्लिक करा.
  • पत्त्याच्या पुराव्याची प्रत स्कॅन करा आणि स्कॅन केलेली प्रत सबमिट करा.
  • आता पेमेंट या ऑप्शन वर जाऊन 50 रुपये पेमेंट भरा.(सरकारने दिलेल्या मुदतवाढीनुसार 14 मार्च 2024 पर्यंत शुल्क आकारला जाणार नाही.)
  • प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ‘सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर’ आपल्याला पुरवला जातो. (सर्व्हिस रिक्वेस्ट नंबरचा वापर आपण आपल्या अपडेट केलेल्या आधारकार्ड ची स्थितीचा मागोवा घेण्यासाठी करू शकता.)Adhar Card Update

2 thoughts on “आधार कार्ड अपडेट करायची संपूर्ण प्रोसेस… जाणून घ्या एका क्लिकवर….!”

Leave a Comment