मुलांच्या जन्म दाखल्यात नाव समाविष्ट किंवा नाव दुरुस्ती कशी करायची ? जाणून घ्या एका क्लिकवर….!

Birth Certificate Correction : जन्म दाखला हे अशे एकमेव कागदपत्र आहे की ज्याचा वापर वेगवेगळ्या सरकारी कामांसाठी पुरावा म्हणून वापर केला जातो.शैक्षणिक कामांसाठी,नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी, आधार क्रमांक नोंदणीसाठी,मतदार यादी तयार करण्यासाठी, सरकारी नोकरीच्या नियुक्तीसाठी, विवाह नोंदणीसाठी अशा विविध कामांसाठी जन्म दाखल्याचा वापर होतो.

पण असे बऱ्याचदा घडते की जन्म दाखल्यावरील नावात चूक असते. नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक असल्याचे आढळते.

अशावेळी आपल्याला शैक्षणिक कामांसंदर्भात अडचणी निर्माण होतात. आणि यामुळे आपल्याला जन्म दाखल्यावरील नावातील चूक दुरुस्त करणं गरजेचं ठरतं.

तसेच, बाळाचा जन्म शहरी भागात झाला की, जन्म प्रमाणपत्र दवाखान्यातून मिळतं. त्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून आवश्यक असलेला जन्म दाखला घ्यायचा असतो परंतु पालकांकडून तो घेतला जात नाही.

त्यामुळे अशी स्थिती निर्माण होते की जन्म झाल्याची नोंद तर आहे, पण त्यात नाव समाविष्ट नाही.त्यामुळे जन्म दाखल्यात नाव समाविष्ट करणं गरजेचं ठरतं.आता आपण जन्म दाखल्यात नाव समाविष्ट कसे करायचे ? आणि तसेच चुकलेले नाव दुरुस्त कशे करायचे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Birth Certificate Correction

Birth Certificate Correction

संबंधित लेख

नाव समाविष्ट कसं करायचं?

जन्माची नोंद झालेले नागरिकच जन्म दाखल्यात नाव समाविष्ट करू शकतात.

राज्यातील नागरिकांची किंवा त्यांच्या मुलांची जन्म नोंदणी नावाशिवाय झाली आहे आणि त्याला 15 वर्षे उलटून गेली आहेत, असे नागरिक आपले नाव जन्म दाखल्यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतात.

तसेच, 1969 पूर्वीच्या जन्म नोंदणींमध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेखच नाही, असे नागरिक सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात.

जन्म दाखल्यात नावाची नोंदणी ही 27 एप्रिल 2036 पर्यंत करता येणार आहे.

तसेच आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, जन्म दाखल्यामध्ये बाळाच्या नावाची नोंदणी करता येणार नाही.

नाव नोंदणीसाठी कुठं जायचं?

ज्या ठिकाणी जन्माची नोंदणी केली आहे तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेशी नागरिकांनी नाव नोंदणीसाठी संपर्क साधायचा आहे.

म्हणजे शहरी भागात नगर परिषद आणि महानगरपालिका आणि ग्रामीण भागात ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे.

शाळा सोडल्याचा दाखला, दहावी-बारावीचं शैक्षणिक प्रमाणपत्र, आधारकार्ड ही कागदपत्रं जन्म दाखल्यात नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक आहे.

त्यानंतर नावासहित जन्म दाखले नागरिकांना दिले जातात.

जन्म दाखल्यात नावाची दुरुस्ती कशी करायची? Birth Certificate Correction

जन्म दाखल्यात नावाची दुरुस्ती करण्यासाठी एक अफेडेव्हिट (प्रतिज्ञापत्र) तयार करुन घेणे गरजेचे आहे.

नावात बदल किंवा दुरुस्ती करणेबाबत,अशा आशयाचं शपथपत्र 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तयार करुन घ्यायचं आहे.

या शपथपत्रात जुनं चुकलेलं नाव,नाव का चुकलं त्यामागचं कारण जसं की नजरचुकीनं नाव टाकण्यात आलं, खरं नाव अमुक आहे, अर्जदाराची संपूर्ण सविस्तर माहिती नमूद करावी.

तुम्ही हे शपथपत्र सेतू कार्यालय किंवा नोटरीच्या वकिलांकडून तयार करुन घेऊ शकता.

या शपथपत्रासोबत पालकांच्या आधार कार्ड आणि बाळाचं आधारकार्डची झेरॉक्स प्रत जोडावी लागते.

वरील सर्व कागदपत्रं जमा केल्यावर आठवड्याभरात तुम्हाला दुरुस्तीसहितचा जन्म दाखला मिळणं अपेक्षित असतं.

जन्म नोंद कशी करतात?

संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांना बाळाचा जन्म झाल्यानंतर त्यासंबंधीची माहिती द्यावी लागते.

बाळाचा जन्म झाल्यापासून 21 दिवसांच्या आत ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांना माहिती दिली पाहिजे.

21 दिवसांच्या आत जन्माची नोंद देणं कायद्यानं बंधनकारक आहे. या मुदतीत नोंद केल्यास दाखला मोफत मिळतो.

2 thoughts on “मुलांच्या जन्म दाखल्यात नाव समाविष्ट किंवा नाव दुरुस्ती कशी करायची ? जाणून घ्या एका क्लिकवर….!”

Leave a Comment